अजिंक्य शक्ती चे तत्व मान्य केल्याशिवाय मनुष्य भगवंतांना समजू शकत नाही. परमेश्वर काही इतका अल्पमोल नाही की, कोणीही तथाकथित योगी परमेश्वर बनू शकेल. असे भोंदू परमेश्वर मूर्ख आणि अज्ञानी लोकांसाठी आहेत. जे बुध्दीमान आहेत ते, अशा भोंदू लोकांकडे अचिंत्य शक्ती आहे की नाही, याची परीक्षा घेतील. आम्ही श्रीकृष्णांचा परमेश्वर म्हणून स्वीकार करतो कारण, त्यांनी आपल्या अचिंत्य शक्तीचे प्रात्यक्षिक दाखविले आहे. बाल्यावस्थेत त्यांनी एक प्रचंड पर्वत उचलला. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण अवतार असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्र यांनी पाण्यावर दगड तरंगत ठेवून स्तंभांखेरीज सेतू बांधला।
मनुष्याने कोणाचाही इतक्या अज्ञानात राहून सहजपणे परमेश्वर म्हणून स्वीकार करू नये. सध्या कोणीही बदमाश भोंदू येतो आणि म्हणतो, ” मी परमेश्वराचा अवतार आहे.” आणि दुसरा मूर्ख ते मान्य करतो. परंतु, भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्या अचिंत्य शक्तीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. काही वेळा लोक म्हणतात की, भगवंताच्या कार्याची वर्णने म्हणजे केवळ कथा किंवा कल्पना आहेत. परंतु हे साहित्य, महान आणि विद्वान ऋषी असणाऱ्या वाल्मिकी, व्यासमुनी आणि इतर आचार्यांनी रचलेले आहे. हे महान ऋषीजन केवळ काल्पनिक कथा लिहिण्यामध्ये आपला वेळ का व्यर्थ घालवतील ? त्या कल्पना असल्याचे त्यांनी कधी म्हटले नाही. त्यांनी ते सर्व वास्तविक सत्यच मानले. उदाहरणार्थ, श्रीमद्भागवताच्या दहाव्या स्कंधामध्ये व्यासमुनी वृंदावनातील वणव्याबद्दल सांगतात. श्रीकृष्णांचे सर्व गोपाळ मित्र विचलित झाले व मदतीसाठी श्रीकृष्णांकडे पाहू लागले. त्यावेळी त्यांनी संपुर्ण अग्नी सहज गिळंकृत केला. तीच अचिंत्य योगशक्ती आहे. तेच खरे भगवान परमेश्वर आहेत. आपण श्रीकृष्णाचे अतिसूक्ष्म अंश असल्याने आपल्या शरीरातही अचिंत्य योग शक्ती आहे. परंतु ती अतिसूक्ष्म प्रमाणात आहे।
म्हणून आपल्याकडे येणाऱ्या भोंदूना किंवा तत्सम माहिती देणाऱ्या तथाकथित व्यक्तीला परमेश्वर समजण्यापेक्षा ज्यांनी या अचिंत्य शक्तीचा योग्य उपयोग करून प्रात्यक्षिक दाखविले त्या प्रत्येक योगशक्तीला परमेश्वर म्हणून संबोधने वावगे ठरणार नाही।