22.4 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेलला एमजी मोटर करणार सन्मानित,स्पेशली कस्टमाइज्ड एमजी एसयूव्ही देणार भेट
व्यापार

पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेलला एमजी मोटर करणार सन्मानित,स्पेशली कस्टमाइज्ड एमजी एसयूव्ही देणार भेट

महाराष्ट्र / ब्यूरो

मुंबई : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. स्त्रीयांची ताकद आणि दृढनिश्चयाची दखल घेत ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर इंडियाने भाविना पटेलच्या ऐतिहासिक कामगिरीला सलाम केला आहे. एमजी मोटर इंडिया स्पेशली कस्टमाइज्ड एमजी एसयूव्ही भेट देऊन चमकदार कामगिरीबद्दल भाविनाचा सन्मान करणार आहे।


भाविनाच्या या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन करताना एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा यांनी ट्विट केले की विजयी पताका घेऊन परतणाऱ्या भाविनाबेनला एमजी कार भेट देणे हा आमचा सन्मान आणि बहुमान असेल।


भारतात प्रवेश केल्यापासून आणि हलोल येथे आपलं उत्पादन सुरू केल्यापासून एमजी मोटर वडोदरा मॅरेथॉनचे प्रायोजक आहे. वडोदरा मॅरेथॉन इतर मॅरेथॉनपेक्षा वेगळी आहे कारण ती नेहमीच विविध सामाजिक उपक्रमात प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केली जाते, ज्यात ‘दिव्यांग रन’ नावाच्या शर्यतीचा सहभाग आहे।


एमजी मोटरने पॅरालिम्पिक ॲथलीट आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. दीपा मलिक यांच्या आवाजाने आपल्या वैयक्तिक एआय सहाय्यकाला देण्याची घोषणा केली आहे. हा प्रयत्न एमजी ब्रँडचे उत्साही आणि आगामी एसयूव्ही अॅस्टरच्या संभाव्य मालकांना अनोखा अनुभव देईल.ऑटोमोटिव्ह ब्रँड असल्याने एमजीने केवळ ऑटोमोटिव्ह क्षेत्रावरच लक्ष केंद्रित केले नाही तर समाजातील महत्त्वाच्या घटकांच्या सक्षमीकरणासाठी सक्रियपणे काम केले आहे।

Related posts

स्टैंडर्ड चार्टर्ड और ईजमाईट्रिप ने लॉन्च किया को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड

Bundeli Khabar

मिलेनियल्स निवेशकों का टैक्स बचत और दीर्घकालिक निवेश पर जोर : पेटीएम मनी

Bundeli Khabar

ऑडी इंडियाकडून ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!