24.7 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210821 WA0018
महाराष्ट्र

डोंबिवलीत खाकीला काळिमा फासणारी घटना, पोलीस हवालदाराने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
कल्याण : डोंबिवली राम नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदारानेच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पोलीस हवलदाराला अटक करण्यात आली आहे. ज्या रामनगर पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्याने त्याला अटक केली आहे .सतीश कारले असे या पोलीस हवलदाराचं नाव असून त्याच निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीत एकच खळबल उडाली आहे।


डोंबिवलीत राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने तिच्या इमारत राहणारे सतीश कारले या पोलिस हवलदाराने इमारतीमधील जिन्यातच छेडछाड करत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्या तरुणीने ही सगळी बाब तिच्या कुटुंबियांना सांगितली. सदर पीडित अल्पवयीन तरुणीने या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात 354 प्रमाणे सतीश कार्ले विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली।


सतीश हा रामनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. याबाबत रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी तक्रार आल्यावर आम्ही त्याला अटक करुन त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचं सांगितले.कल्याणचे पोलिस उपायुक्तांनी सतिशच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहेब।


Bundelikhabar

Related posts

भाजपा युवा नेता विवेक तिवारी दिंडोशी विधानसभा के बने सह प्रभारी

Bundeli Khabar

या रहिवाशांना असे वाऱ्यावर सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत यातून मार्ग काढणे गरजेचे:खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

Bundeli Khabar

येरवडा जेल में बंद भाई का जन्मदिन

Bundeli Khabar
error: Content is protected !!