22.4 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20210801 WA00072
महाराष्ट्र

कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पोहचले थेट गावांगावात

Bundelikhabar

• कोकणातील महाड, खेड, चिपळूण आदी विविध पूरग्रस्त भागांना भेट देत, नागरिकांशी थेट साधला संवाद

• अन्नधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाणी यांसोबत इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

• डोंबिवली शहरशाखा तसेच शहरप्रमुख राजेश मोरे यांनी घेतला मदतीचा पुढाकार

मुम्बई / प्रमोद कुमार

महाड : गेल्या आठवड्याभरात विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे कोकणातील महाड शहर आणि बाजारपेठेत १३ फुटापर्यंत पाणी साचल्याने तेथील गावांतील घरामधले अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले मोठे हाल झाले होते.त्यासाठी कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृवाखाली शिवसेना डोंबिवली शहर शाखा आणि शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या पुढाकाराने कोकणातील पूरग्रस्त महाड, खेड, चिपळूण आदी भागातील नागरिकांच्या मदत सेवेकरिता अन्नधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाणी यांसोबत जीवनावश्यक वस्तूंनी भरगच्च भरलेले एकूण १६ ट्रक आणि १ एसटी महामंडळाची बस दि. ३० जुलै रोजी झेंडा दाखवून रवाना करण्यात आले, त्याचबरोबर ३१ जुलै रोजी स्वतः प्रत्यक्ष जाऊन महाड, खेड, चिपळूण आदी भागातील विविध गावांतील पूरग्रस्त भागाचा दौरा करत तेथील नागरिकांची भेट घेत मदतीचा हात दिला. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, मा. नगरसेवक दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, राजेश कदम, मा. सरपंच खोणी हनुमान ठोंबरे, उल्हासनगर मनपा नगरसेवक अरुण आशान, व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते।

यह भी पढ़ें-अत्यावश्यक सेवांमध्ये राज्यातील पत्रकारांचा समावेश व लोकल प्रवास अनुमति साठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पूराचे पाणी ओसरल्यावर पूरग्रस्त भागात वाहून आलेला कचरा, गाळ, घाण जमा होणे आणि यामुळे विषाणूंचा प्रसार होऊन साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन तातडीने शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री आणी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी आणि टीडीआरएफ जवानांच्या मदतीने कोकणातील महाड शहर स्वच्छ आणि निर्जंतूकीकरणाचे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सह अन्य स्थानिक प्रशासनासह महाड येथील विविध पूरग्रस्त भागांना भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहरात सुरु स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर महाड येथील कोठेश्वरी तळे, प्रभात कॉलनी येथील पूरग्रस्त बांधवांकरिता आणलेले अन्नधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाणी यांसोबत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले।

यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने पूरग्रस्त बांधवांकरिता आरोग्य शिबीर सुरु असून या शिबिराला भेट देत तेथील डॉक्टरांशी संवाद साधत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात आरोग्य तपासणी करुन घेण्याचे, आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी केले. या मोफत आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी नंतर रुग्णांना लागणारी औषधे मोफत दिली जात आहेत।

IMG 20210801 WA00073

Bundelikhabar

Related posts

मुली वाचवा मुली शिकवा हा दृष्टिकोन सर्वांनी समोर ठेवून स्रीभ्रूण हत्या टाळावी- प्रताप राव पाटील

Bundeli Khabar

“मृदगंध” पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण

Bundeli Khabar

रस्त्यांची होणारी बोगस कामे हा ठाणे जिल्ह्याला शाप आहे – कपिल पाटील

Bundeli Khabar
error: Content is protected !!