24.2 C
Madhya Pradesh
October 18, 2024
Bundeli Khabar
Home » कुवेत टेनिस क्रिकेट लिग जोषात सुरूवात
खेल

कुवेत टेनिस क्रिकेट लिग जोषात सुरूवात

कुवेत (गुरुदत्त वाकदेकर) : क्रिकेट एक असा खेळ जो जात-पात-धर्म-देश यांच्या सार्‍या सीमा पार करून माणसाला एकत्र आणतो. एक संघ भावनेने विचार करायला शिकवतो. तोच खेळ जेव्हा सातासमुद्रापलीकडच्या देशात मराठी मातीतील खेळाडू खेळतात तेव्हा पुन्हा एकदा विजय होतो तो क्रिकेटचा.

कुवेत टेनिस क्रिकेट लिगच्या निमित्ताने हा योग पुन्हा एकदा जुळून आला आहे. रणरणत्या उन्हाचे चटके सोसत जेव्हा फलंदाज प्रत्येक धाव जोडण्यासाठी धावत असतात तेव्हा गोलंदाजही टिच्चून मारा करून बळी मिळवत असतात. खेळ म्हंटला की एक संघ जिंकणार, पण हरणारा संघही आपलं मोलाचं योगदान देत असतो.

कुवेत टेनिस क्रिकेट लिग कुवेत मधीत सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. दोन महिने चालणार्‍या ह्या स्पर्धेत ३२ संघांचा सहभाग आहे. दोन गटांमध्ये विभागणी केलेल्या ह्या संघात प्रत्येकी १६ षटकांचा सामना खेळवला जात आहे.

कालचा सामना केके वॉरियर्स विरुद्ध अदान एलेव्हन ह्यांच्यात चुरशीचा झाला. केके वॉरियर्सने हा सामना जिंकला. त्यांच्या हसन काझी यांनी १०६ धावा काढून सामनावीर पुरस्कार प्राप्त केला. “हुनर बिझनेस नेटवर्क” चे संचालक तसेच भारतात आणि भारताबाहेरही समाजसेवा आणि व्यवसाय तसेच खेळांना प्रोत्साहन देणारे आसिफ नूर हसन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

Related posts

टाटा आयपीएल – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ६७ धावांनी विजयी

Bundeli Khabar

पंजाब किंग्सचा मोठ्या फरकाने विजय

Bundeli Khabar

सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट में संजय राउत, जितेंद्र आव्हाड, प्रवीण आमरे व शहजाद खान की उपस्थिति

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!