30.8 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20220602 WA0007
महाराष्ट्र

‘स्टार भारत’ च्या ‘स्वयंवर – मिका दी वोटी’ वर मिका सिंग ला त्याची योग्य पत्नी निवडण्यात हिना खान करणार मदत!

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

संतोष साहू,

मुम्बई। मिका सिंग ने अखेरीस ठरवले आयुष्यात स्थायिक व्हायचे आणि स्वतःसाठी एका पत्नी ‘वोटी’ शोधायची हे सगळं घडणार आहे ‘स्वयंवर – मिका दि वोटी’ या शो मध्ये, ज्यात त्याला त्याचे इंडस्ट्री मधले सगळे मित्र पाठिंबा देणार आहेत. अशीच एक मैत्रीण म्हणजे सर्वांची आवडती ‘बहू’ हिना खान. हिना खान मिका सिंग ला तिचा पाठिंबा दर्शवण्यासाठी भेट देण्याची शक्यता आहे आणि त्याच्या बरोबर आयुष्य शेअर करण्यासाठी एक योग्य व्यक्ती निवडण्यात त्याला प्रोत्साहित सुद्धा करेल.

मिका सिंग चे बॉलीवूड मध्ये अनेक जवळचे मित्र आहेत आणि त्यापैकी बहुतेकांनी त्याच्या आगामी शो च्या सेटला भेट देऊन आधीच त्याला पाठिंबा दर्शविला आहे, जिथे मिका पाजी त्याच्या सर्वात महत्वाच्या प्रवासात दिसणार आहेत. अशीच एक सेलिब्रिटी हिना खान आहे आणि आम्ही त्यांची मैत्री यापूर्वी पाहिली आहे जी खरोखरच प्रिय आहे. त्यामुळे मिका सिंग त्याच्या नवीन शो च्या शूटिंग दरम्यान व्यस्त असताना हिना खान भेट देणार हि शक्यता आहे.

सदैव – सुंदर हिना खान अनेक प्रतिष्ठित भूमिकांमध्ये दिसली आहे आणि या भूमिकांमध्ये नेहमीच तिचा उत्कृष्ट अभिनय देते. ती एक समर्पित कलाकार आणि एक व्यक्ती आहे जिने मनोरंजनाच्या उद्योगात तिची क्षमता सिद्ध केली आहे. मिका सिंग आणि हिना खान या दोघांसाठी ‘स्वयंवर – मिका दी वोटी’ चा भाग बनल्यास हा एक सगळ्यांसाठी आश्चर्यकारक अनुभव असेल. त्यांच्या केमिस्ट्रीमुळे शो मधील वातावरण बदलण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते अधिक उत्साही आणि आनंदी असणार.

मिका सिंग त्याचा नवीन शो ‘स्वयंवर – मिका दी वोटी’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याने आपले जीवन संगीतासाठी समर्पित केले आहे आणि आता त्याचे सर्व अनुभव शेअर करण्यासाठी जीवनसाथी शोधण्याची वेळ आली आहे. त्याचा आनंदी जीवनाचा प्रवास पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि त्याच्यासाठी अधिक आनंदी होऊ शकत नाही.
‘स्वयंवर – मिका दी वोटी’ च्या अधिक माहितीसाठी बघत रहा स्टार भारत आणि हा शो लवकरच आपल्या भेटीला येणार आहे, तर तयार रहा १९ जुने २०२२ रोजी.


Bundelikhabar

Related posts

आईजी इंटरनेशनल ने पीडब्ल्यूसी की सहायता से ईएसजी कार्यक्रम पर दिया ज़ोर

Bundeli Khabar

लोक कल्याण की दिशा में अग्रसर हैं डॉ परिन सोमानी

Bundeli Khabar

जाणून घ्या अंडाशयाच्या कर्करोगाबद्दल – डॉ सुहास आग्रे

Bundeli Khabar
error: Content is protected !!