14 C
Madhya Pradesh
November 14, 2025
Bundeli Khabar
Home » टाटा आयपीएल – गुजरात टायटन्सने १६ गुणांसह प्रथम क्रमांकावर
खेल

टाटा आयपीएल – गुजरात टायटन्सने १६ गुणांसह प्रथम क्रमांकावर

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टाटा आपीएल २०२२ चा त्रेचाळीसावा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आला. गुजरात टायटन्सने ६ गडी आणि ३ चेंडू राखून जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा काढल्या. खूप दिवसांपासून शांत असलेली त्याची बॅट आज सुसाट झाली होती. त्याने ६ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने ५३ चेंडूंत ५८ धावा काढल्या. त्याला महंमद सामीने त्रिफाळाचित केले. रजत पतिदारने ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ३२ चेंडूंत ५२ धावा काढल्या. त्याला प्रदीप सांगवानने बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १८ चेंडूंत ३३ धावा काढल्या. त्याला लॉकी फर्ग्युसनने बाद केले. महिपाल लोमरॉरने २ चौकार आणि १ षटकारांच्या सहाय्याने ८ चेंडूंत १६ धावा काढल्या. त्याला डावाच्या शेवटच्या चेंडूवर अल्झारी जोसेफने बाद केले. २० षटकांच्या अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू १७०/६ असा धावांचा डोंगर उभा करू शकले. प्रदीप सांगवानने १९/२, रशिद खानने २९/१, लॉकी फर्ग्युसनने ३६/१, महंमद सामीने ३९/१, अल्झारी जोसेफने ४२/१ यांनी गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल गुजरात टायटन्सकडून वृद्धिमान सहाने ४ चौकारांच्या सहाय्याने २२ चेंडूंत २९ धावा काढल्या. त्याला वाणिंदू हसरंगाने बाद केले. शुभमन गीलने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २८ चेंडूंत ३१ धावा काढल्या. त्याला शाहबाझ अहमदने पायचीत पकडले. साई सुदर्शनने २ चौकारांच्या सहाय्याने २० धावा काढल्या. त्याला वाणिंदू हसरंगाने बाद केले. राहुल तेवटीयाने ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने २५ चेंडूंत बिनबाद ४३ धावा काढल्या. डेव्हिड मिलरने ४ चौकार आणि १ षटकार यांच्या सहाय्याने २४ चेंडूंत ३९ धावा काढल्या. राहुल तेवटीयाने विजयी चौकार मारून सामना गुजरातच्या नावावर कोरला. शाहबाझ अहमदने २६/२, वाणिंदू हसरंगाने २८/२ यांनी गडी बाद केले. राहुल तेवटीयाला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याने बिनबाद ४३ धावा काढल्या होत्या.


Bundelikhabar

Related posts

यूपीएल लिमिटेड और nurture.farm अबू धाबी टी10 में गत विजेता नॉर्दर्न वॉरियर्स के क्रमशः प्रिन्सिपल स्पॉन्सर और ऑफिशियल स्पॉन्सर

Bundeli Khabar

डब्ल्यूडब्ल्यूआई ने 2022 के एडमिशन के लिए एंट्रेंस एक्ज़ाम की तारीख घोषित की

Bundeli Khabar

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची विजयासाठी शर्थीची झुंज

Bundeli Khabar
error: Content is protected !!