39.8 C
Madhya Pradesh
May 19, 2024
Bundeli Khabar
Home » कोलकत्त्याचा झटपट विजय
खेल

कोलकत्त्याचा झटपट विजय

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कोलकत्ता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज्स इलेवन यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टाटा आपीएल २०२२ चा आठवा सामना कोलकत्त्याने झटपट जिंकला. कोलकत्त्याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पंजाब कडून खेळाची सुरूवात करायला कर्णधार मयंक अगरवाल आणि शिखर धवन उतरले. उमेश यादवचे चेंडू कसे खेळावेत हेच मयंकला समजत नव्हते. पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उमेशने मयंकला पायचित टिपले. भानुका राजपक्ष केवळ ९ चेंडू फलंदाजी करून गेला पण त्यात प्रत्येकी ३ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने त्याने ३१ धावा काढल्या. शिवम मावीच्या गोलंदाजीवर टीम साऊदीने सुंदर झेल टिपला. धवनच्या बॅटवर चेंडू पाहिजे तसा येत नव्हता ह्याच संधीचा टीम साऊदीने पुरेपूर फायदा उचलला आणि त्याला सॅम बिलिंग्सकडे झेल देण्यास भाग पाडले. लिअम लिव्हिंगस्टोन संयमीत फलंदाजी करत होता. त्याला उमेश यादवने टीम साऊदीकडे झेल देण्यास भाग पाडले. राज बावा सावध पवित्रा घेऊन डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत होता. पण सुनील नरिनने त्याला चकवत त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. ९.३ षटकांत पंजाबचा निम्मा संघ तंबूत परतला होता. शाहरूख खानला टीम साऊदीने नितीश राणाकडे शून्यावर असतानाच झेल देण्यास भाग पाडले. हरप्रित ब्रारचा त्रिफाळा उमेश यादवने उध्वस्त केला. त्याच षटकात उमेश यादवने राहुल चहरला शून्यावर बाद केले. कगिसो रबाडाने झटपट २५ धावा काढल्या. चार चौकार आणि १ षटकार त्याने मारला होता. अांद्रे रसेलने त्याला टीम साऊदीकडे झेल देण्यास भाग पाडले. शेवटी फलंदाजीला आलेल्या अर्शदीप सिंगच्या चुकीमुळे तो धावबाद झाला. पुन्हा लागोपाठ एकाच षटकात दोन गडी बादवझाले. स्मिथ बिनबाद ९ वर असताना सारा संघ डावातले १० चेंडू बाकी असताना तंबूत परतला होता.
कोलकत्ता नाईट रायडर्सच्या डावाची सुरूवात अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी केली. कगिसो रबाडाने सामन्याच्या दुसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर रहाणेला वाद केले. ओडियन स्मिथने त्याचा झेल पकडला. कर्णधार श्रेयस अय्यर ह्याच्या साथीने व्यंकटेश चांगली भागीदारी रचेल असं वाटत असतानाच ओडियन स्मिथने व्यंकटेशला हरप्रित ब्रारकडे झेल देण्यास भाग पाडले. सॅम बिलिंग्स सोबत श्रेयस मोठी भागीदारी रचेल असं वाटत असतानाच श्रेयस २६ धावा काढून बाद झाला. राहुल चहरने रबाडाकडे त्याला झेल देण्यास बवाग पाडले. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नितीश राणाला चहरने शून्यावर पायचित टिपले. ५१/४ अशी कोलकत्त्याची अवस्था झाली. आजच्या सामन्यात एकाच षटकात दोन गडी बाद होण्याचा हा तिसरा प्रसंग ठरला. त्यानंतर आलेल्या आंद्रे रसेलने सामन्याची सारी सूत्रं आपल्या हातात घेतली. चौफेर टोलेबाजी करत दोन चौकार आणि ८ षटकारांच्या सहाय्याने त्याने केवळ ३१ चेंडूंत बिनबाद ७० धावा काढल्या. तर सॅम बिलिंग्सने प्रत्येकी १ चौकार आणि षटकार मारत बिनबाद २४ धावा काढल्या. डावाची ३३ षटके बाकी असतानाच कोलकत्याने १४१/४ असा सामना झटपट संपवला.
मागील दोन हंगामात केवळ दोन सामने खेळलेल्या उमेश यादवने यंदा नेट्समध्ये बराच वेळ घालवलेला दिसत आहे. त्याचं फळ त्याला मिळत आहे. त्याने ४ षटकांत २३ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद केले. ह्या चारपैकी एक षटक त्याने निर्धावही टाकलं होतं. त्याला सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला.
उद्या दोन सामने होणार आहेत. मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर तर दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबईला आपला पहिला विजय हवा आहे. तर इतर तीन संघांना विजयी घौडदौड कायम ठेवायची आहे.

Related posts

लखनौ संघच ठरला सुपर जायंट्स

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून विजय

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – गुजरात टायटन्स १२ अंकांसह क्रमांक १ वर विराजमान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!