24.4 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20220301 WA0030 1
महाराष्ट्र

गावाची ओळख प्रवेश द्वार व रस्त्यामुळे होते- दयानंद चोरघे

Bundelikhabar

प्रशांत मार्के यांच्या पाठपुराव्याने चिराडपाडा गावातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ!
भिवंडी : भिवंडी पिसे चिराडपाडा मध्ये रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा राष्ट्रीय काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्या शुभहस्ते नुकताच मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. भिवंडी मधील चिराडपाडा परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे , नागरिकांना जाण्या-येण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनाद्वारे प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे लक्षात घेता पिसे चिराडपाडा माजी सरपंच प्रशांत नारायण मार्के यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी मार्के यांच्या मागणीला हिरवा सिग्नल देत मा.ना.श्री.बाळासाहेब थोरात व मा.ना.श्री. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद फंडामधून रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व समस्या मार्गी लावली. रस्त्याचा महत्त्वाचा प्रश्न सुटल्यामुळे गावातील ग्रमस्थांनी श्री.दयानंद चोरघे आणि प्रशांत मार्के यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाण्याची समस्या देखील सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, भिवंडी तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या वतीने मोठे प्रवेशद्वार कमानी गावाची ओळख म्हणून आपल्याला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे चिराडपाडा या गावाला स्वागत कमान व रस्त्यांमुळे या गावाची नवीन ओळख तयार करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असे जिल्हाध्यक्ष श्री दयानंद चोरघे यांनी यावेळी सांगितले. सदर भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रेश्मा रवींद्र धमणे, कपिलदेव पुंडलिक सपाट, मनीषा कैलास जाधव, अनिल जाधव ,संतोष पोंधेकर,अशोक सपाट, रवींद्र धमणे,हरिभाऊ धमणे,नितीन जाधव, विनायक धमणें,दिपेश मार्के, दीपक धमने, वाशेरे चे सरपंच विश्वास माघे, नवनाथ सुतार,दीपक पाटील,सत्यवान जोशी,हेमंत पाटील, निकेश पाटील, डी वाय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश पाटील,किरण केणे , ज्ञानेश्वर ढमणे आधी पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

वाडा तहसिल कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुरावस्था. लाखों रूपये खर्च करूनसुद्धा स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य

Bundeli Khabar

संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियाना अंतर्गत फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन

Bundeli Khabar

आगरी समाज व इतर समाज्याच्या आशीर्वादाने मराठी बिग बॉस सीजन – 3 मध्ये लोकप्रिय सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादूसची धमाल

Bundeli Khabar
error: Content is protected !!