21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » सभ्य समाजसेवक काळाच्या पडद्याआड
महाराष्ट्र

सभ्य समाजसेवक काळाच्या पडद्याआड

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं ८१व्या वर्षी निधन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. सुधीर जोशी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक रूग्णालयामध्ये उपचार सुरु होते. ते नुकतेच करोनाच्या आजारातून बरे होऊन घरी परतले होते. सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, असं मानलं जातं. शिवसेना पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. ते शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते.

सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले. सुधीर जोशी हे १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले, तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. ते १९६८ पासून विधान परिषद सदस्य होते. ते १९९२-९३ या दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करुन त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. युतीच्या सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.

सुधीर जोशी यांनी मुंबईचे महापौर ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले होते. त्यांनी आजारपणामुळे १९९९ मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.
सुधीर जोशी म्हणजे शिवसेनेचे जेष्ठ नेते, माजी मंत्री एवढीच भाऊंची मर्यादित ओळख नाही. शिवसेनेच्या स्थापनेनंतर ठाणे महापालिका सर केल्यानंतर १९६८ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला आणि पहिल्यांदाच शिवसेनेचे ४२ नगरसेवक निवडून आले. त्यात सुधीर भाऊंचाही क्रमांक होता. सुधीर भाऊ पुन्हा १९७३ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. सुधीर भाऊ सर्वात तरुण नगरसेवक होते. १९७३-७३ मधे गठबंधनात शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित होते. प्रश्न होता संधी कोणाला द्यायची. मनोहर जोशी, वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, शरद आचार्य, चंद्रकांत पडवळ अशी किती तरी जेष्ठ नेते मंडळी होती. बाळासाहेबांनी सारासार विचार करून सुधीर भाऊंना शिवसेनेतर्फे मुंबईच्या पहिल्या तरुण महापौरपदी विराजमान केले.

शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत प्रामुख्याने त्यांचे भाषण होई. त्यांच्या शब्दांत अत्यंत ओजस्वीपणा आणि श्रोत्यांना आकर्षित करण्याची ताकत असे.
भाऊंनी स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक मराठी तरुणांना बँक, निमसरकारी आस्थापनांत, विमा, विमान कंपन्या अशा कितीतरी ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्या. एवढेच नव्हे तर त्या तरूणांना शिवसेनेकडे आकर्षितही केले. एक हरहुन्नरी आणि राजकारणातील अत्यंत सभ्य नेतृत्व म्हणजे सुधीर भाऊ जोशी आज शिवसेनेने आणि अवघ्या महाराष्ट्राने गमावले.

Related posts

बिसलेरी ट्रस्ट’तर्फे ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाद्वारे वापरलेल्या, स्वच्छ व कोरड्या 650 किलो प्लास्टिकचे

Bundeli Khabar

सतयुगी संस्कार अपनाने से बनेगा स्वर्णिम संसार: बीके शिवानी दीदी

Bundeli Khabar

शिवडी राष्ट्रवादीतर्फे कॅन्सरग्रस्तांना धान्य वाटप

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!