28.8 C
Madhya Pradesh
October 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20211025 WA0000
खेल

राज्यस्तरीय ज्यूडो चॉम्पियनशीपसाठी मुंबईत चाचणी

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्युडो स्टेट चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्र अ संघाच्या (मुंबई) सब-ज्युनिअर अँड कॅडेट (बॉईज अँड गर्ल्स) साठी निवड चाचण्या सोमवार, २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मरीन ज्युडो क्लब, आरोग्य धन संपदा हॉल, लिबर्टी गार्डन, मालाड वेस्ट येथे होणार आहेत. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सांगली येथे राज्य चॅम्पियनशिप होणार आहे.
अनेक महिन्यांच्या अनिश्चिततेनंतर आणि अडचणींनंतर, क्रीडा क्षेत्र आपले उपक्रम पुन्हा सुरू करीत आहे. भारतीय ज्युडो फेडरेशन या ज्युडो नॅशनल्स सब-ज्युनिअर आणि कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिप २०२१-२२, (मुले आणि मुली) ७ ते १३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत इनडोअर स्टेडियम, चंदीगड विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे आयोजित करीत आहे. एमआयएएस, भारत सरकार आणि जेएफआय यांनी जाहीर केलेल्या नियमांनुसार आणि एसओपीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व संघ तसेच सहभागींना कोव्हिड नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ७२ तास आधी नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. (कॅडेट आणि सब-ज्युनिअरच्या आगमनाच्या दिवसापर्यंत ३ दिवसांच्या आत). २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ दरम्यान लेबनॉन येथे होणाऱ्या आशिया ओशनिया कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपसाठी आणि आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठी जेएफआय भारतीय कॅडेट ज्युडो संघाची निवड करेल.


Bundelikhabar

Related posts

टाटा आयपीएल – मुंबईने केले दिल्लीचे पतन

Bundeli Khabar

टाटा आयपीएल – हैदराबादच‍ा विजयी सनराईझ

Bundeli Khabar

भारताचा झिम्बांब्वेवर ५ गडी राखून विजय

Bundeli Khabar
error: Content is protected !!