21.6 C
Madhya Pradesh
October 6, 2024
Bundeli Khabar
Home » आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचा वर्धापन दिना निमित्त अनाथांना पोषक आहारातून मायेचा हात
महाराष्ट्र

आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचा वर्धापन दिना निमित्त अनाथांना पोषक आहारातून मायेचा हात

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमत्त जीवन संवर्धन बेघर अनाथ आश्रमातील 100 मुलांना पोषक व गोडधोड जेवण देऊन साजरा करण्यात आला.
समाजातील बेघर व अनाथ मुलांना या माध्यमातून मायेची ऊब देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे अध्यक्ष जितेन्द्र पाटील यांनी सांगितले.
आपल्याला प्रत्येकाला घरचे जेवण मिळण्याचे सौभाग्य लाभले आहे, परंतु समाजातील अशा बेघर आणि अनाथ मुलाच्या नशिबी मात्र हे भाग्य लाभत नाही, म्हणुनच संस्थेच्या या आनंददायी प्रसंगी मुलांना सहभागी करून घेण्यासाठी सदर वर्धापन दिनाचा कार्यक्रम जिवन संवर्धन संस्थेसोबत साजरा करण्याचा निर्णय संस्थाध्यक्ष व पदाधिकर्यांनी घेतल्याचे सांगणयात आले.
विविध आजारांवर मोफत उपचार करणे, गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देणे, अपंगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून देणे, कोरोना काळात उद्योग आणि कामे बंद पडल्यामुळे गरजूंना लागणाऱ्या घरगुती वस्तूंचे वाटप करणे, रस्त्यावरील उपाशी लोकांना अन्नदान करणे
अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष जितेन्द्र पाटील यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांच्या माध्यमातून हळुवारपणे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे मत उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी व्यक्त केले
प्रमुख पाहुणे : डॉ. अधीक लोखंडे. डॉ.सुनील महाजन.श्री.रवी कदम.
विशेष सहकार्य : मा.उमेश दादा गुंजाळ ( नगरसेवक. अंबरनाथ ) मा.हरिचंद्र पाटील ( माजी महापौर. ठाणे )
सौ.मुक्ता जाधव (सचिव ) श्री.संजय तरे ( पब्लिक रिलेशन ऑफिसर ) सौ.तनवी हुलवले ( ठाणे कार्याध्यक्ष ) श्री.सचिन नाईक ( सहसचिव ) श्री आनंद तायडे ( सदस्य )श्री अभिजीत राजपूत ( महाराष्ट्र कार्याध्यक्ष ) श्री विठ्ठलसिंग मोरे ( जळगाव कार्याध्यक्ष ) शेजल मुरकर. राम मंडल. राजेश मुरकर. लता काळे. शुभम मुरकर. सुनील. मनिष यांचे सहकार्य लाभले.
यासारखी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती विरळच असल्याने आणि संस्थेचे हे कार्य निरंतर असेच सुरू राहावे यासाठी देखिल संस्थेचे अध्यक्ष जितेन्द्र पाटील व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.

Related posts

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Bundeli Khabar

चेतक फेस्टिवल का आयोजन महाराणा प्रताप के प्रिय घोड़े की स्मृति में 300 सालों से हो रहा है : रावल जयपाल सिंह

Bundeli Khabar

ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!