तरुण युवकांनी रात्रीच्या वेळी आपल्या गावचे संरक्षण करण्यासाठी पोलिस यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे – मिथुन घुगे
अकोले तालुका भयमुक्त करण्याचा संकल्प – नरेंद्र साबले
किशोर पाटील/महाराष्ट्र
अहमदनगर : सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्य प्रमाणे जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून अन्याय अत्याचार याची समूळ नष्ट करण्यासाठी व पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या जरा याप्रमाणे काम करत असताना जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेने विषयी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी मित्रांकडून सुरू असतो प्रत्येकाला न्याय देण्याचे काम होत असताना कोणाचे मन दुखावणार नाही कोणावर अन्याय होणार नाही ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्यांनी थेट पोलिस स्टेशनला येऊन आपली कैफियत मांडावी त्यावर मार्ग काढणे व त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे परम कर्तव्य असून तालुक्यात क्षेत्रफळ मोठे असून दोन ठिकाणी पोलीस स्टेशन असले तरीही पोलीस कर्मचारी वर्गाची उपलब्धता कमी आहे तर दुसरीकडे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेला अकोले तालुक्यात पेट्रोलिंग साठी एक गाडी असल्यामुळे या संपूर्ण कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करण्यासाठी आमची देखील दमछाक होते राजूर व अकोले या दोन पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले कार्यक्षेत्र हे मोठ्या प्रमाणात असून डोळ्यातील वतून पोलिस यंत्रणा रात्रंदिवस संरक्षण देण्याचे काम करत आहे मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून त्यावर जबर बसविण्यासाठी आमची यंत्रणा सक्षम असून जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील पोलीस उपाध्यक्ष राहुल मदने यांच्या आदेशानुसार भयमुक्त अकोली तालुका करण्याचे आमचे स्वप्न असून या तालुक्यातील जनतेला पोलीस आपल्या दारी ही संकल्पना दाखवून दिले आहे मात्र भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यावर आमची यंत्रणा कार्यरत असून नक्कीच पोलीस मित्रांविषयी जनतेमध्ये असलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही ,अकोले तालुक्यातील १४५ गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल यांना बरोबर घेऊन रात्रीचे पेट्रोलिंग केले जाईल असे मत अकोले पोलीस स्टेशनचे सिंघम पोलीस अधिकारी मिथुन घुगे व राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी काल दैनिक गांवकरी दैनिक जनप्रवास दैनिक सांज महानगरी कार्यालयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले तर संगमनेर तालुक्याचे भूमिपुत्र व अंबरनाथ येथील समाजसेवक युवा नेते गणेश हासे यांना नुकताच कोल्हापूर येथे उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छ व शिवरायांची मूर्ती देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला ,यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, तालुका उपाध्यक्ष ललित मुर्तडक, नामवंत उद्योजक तथा अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मैड ,अगस्ती उद्योग समुहाचे संचालक नामवंत उद्योजक संदीप मोरे यांच्या शुभहस्ते पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे व गणेश हासे यांचा यावेळी पुणेरी पगडी व शाल श्रीफळ व शिवरायांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला, तर यावेळी अकोले विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा अकोले तालुका असून या तालुक्यातील सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई रंदा फॉल या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून गेल्या दोन वर्षांपासून कोरूना सारख्या महाभयंकर रोगाने या भागातील पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पोलिस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होतो या भागातील युवकांना यामुळे मोठा रोजगार मिळत असला तरी केंद्र व राज्य सरकारकडून तिसऱ्या लाटे संदर्भात आदेश प्राप्त होत आहे नगर जिल्हा देशामध्ये तिसर्या क्रमांकावर असून संगमनेर अकोले श्रीगोंदा हे तिन तालुके आघाडीवर आकडेवारी दिसत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील प्रांत अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी याबाबत संबंधित विभागांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत आम्ही देखील येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना याबाबत वेळोवेळी जी माहिती दिली आहे नागरिकांनी देखील आपल्या जीवाची काळजी घ्यावी पोलिस यंत्रणेला मदत केली पाहिजे ग्रामसुरक्षा दल गावागावात कारवानी करून तरुण युवकांनी रात्रीच्या वेळी आपल्या गावचे संरक्षण करण्यासाठी पोलिस यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे ज्या ठिकाणी अनेक वर्षांपासूनचे वाद-विवाद असतील ते लोक अदालत या सारख्या योजनेमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन ते मी ठेवले पाहिजे पोलीस व जनता या मधील असलेला सुसंवाद वाढला पाहिजे जनतेला देखील पोलिसांविषयी सांगली सहानुभूती असून अन्याय अत्याचार होत असेल तर आपण देखील थेट पोलीस स्टेशनमध्ये येऊन याबाबत माहिती दिली पाहिजेत कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही दोघे जण घेऊ आम्ही देखील माणूस असून पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या, तसेच तालुक्यातील अवैद्य धंदे अवैद्य व्यवसाय चालू देणार नाही, यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व जिल्हा पोलीस उपाध्यक्ष राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली या भागातील जनतेला भयमुक्त जीवन जगण्यासाठी सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्य प्रमाणे आम्ही काम करत आहोत कोणाला काही विशेष माहिती मिलाली तर ती त्यांनी आमच्या पर्यंत तातडीने द्यावी जेणे करुण कारवाई करण्यासाठी आम्ही कोठेही मागे पडणार नाही दूध भेसळ प्रकरण असो किंवा गांजा प्रकरण असो यामध्ये आम्ही कारवाई केली यापुढे देखील असे काही प्रकार आपल्या भागात होत असतील तर आम्हाला नक्की कळवा जे कुणी आम्हाला माहिती देतील त्यांचे नाव आम्ही गोपनीय पद्धतीने ठेवू गावागावात शासनाच्या योजना राबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे गणपती विसर्जनानंतर आता नवरात्र उत्सव येत असून या काळामध्ये महिलांच्या नवरात्र उत्सव काळामध्ये सोशल डिस्टेशन पाळुन हा सण साजरा करावा डीजे बँजो पार्टी यासारख्या प्रदूषण मुक्त व कुणालाही आपल्यापासून त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी हा उत्सव देखील प्रत्येक गावागावात साजरा करत असताना प्रत्येकाने कोव्हीड 19 मध्ये काळजी घ्यावी महिलांनी देखील या काळामध्ये योग्य ती काळजी घ्यावी ग्राम सुरक्षा दलांनी गावागावांमध्ये या उत्सव काळामध्ये पेट्रोलिंग गस्त करून आपल्या गावांमध्ये कोणतीही अनोळखी व्यक्ती दिवसभरामध्ये फिरकत असेल तर तिला जाब विचारला पाहिजे सध्या चोरट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी ती दहशत मोडून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तपास कार्य सुरू असून नक्कीच भुरट्या चोरांना आवर घालण्याचे काम दोन्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक करतील असा आशावाद देखील यावेळी व्यक्त करण्यात आला एक मात्र कोणावरही अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही तो उच्च पदावर असो किंवा सर्वसामान्य असो कायदा सर्वांना सारखाच आहे त्या कायद्याचे सर्वांनी पालन केलेच पाहिजे कायद्याचे जो पालन करणार नाही व तो कायदा हातात घेईल यावर देखील आम्ही योग्य ती कारवाई करू भयमुक्त अकोले तालुका ही ओळख आम्ही आपनास दाखवून देऊ असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला अकोले तालुका हा नाशिक ठाणे पुणे या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असून याठिकाणी महाराष्ट्रात कोठे नाही ते अगस्ती ऋषीं चे मंदिर अमृतेश्वर रतनगड ताकारी येथील अंबिका मंदिर सिद्धेश्वर घोरपडा देवी ही मंदिरे असून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या सर्वसामान्य नागरिकाला संरक्षण देणे व त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याला संरक्षण देणे हीच आमची कामाची पद्धत असून कोणालाही दुखवणे किंवा त्याच्यावर सूड भाव पद्धतीने कोणतीही कारवाई आम्ही करत नाही मात्र ज्या भागात असे काही उद्योग सुरू असतील त्यांनी गोपनीय पद्धतीने पोलिस यंत्रणेला मदत करावी २४ तास पोलिस आपल्या संरक्षणासाठी सज्ज आहेत त्यामुळे जनता व पोलीस या दोघांमधील सुसंवाद वेळोवेळी घडवून आला तर नक्कीच नागरिकान मधील भयमुक्त असलेले वातावरण दूर होऊ शकते असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी बोलतांना व्यक्त केला।

