29.6 C
Madhya Pradesh
July 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20210831 WA0041
व्यापार

गोदरेज अँड बॉयस तर्फे खंडाळा येथील तोंडाळ मच्छिमार समाजाला मदत

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र
मुम्बई : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने महाराष्ट्रातील शिरवळ मधील खंडाळा तालुक्यातील तोंडाळ गावातील मच्छिमार समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करत असल्याचे आज जाहीर केले. गोदरेजच्या सीएसआर उपक्रमांतर्गत त्यांनी मासेमारीसाठी ६ नौका, मासेमारीची जाळी आणि ज्यांचे संपूर्ण जीवनच मासेमारीवर अवलंबून आहे अशा गावातील १२-१५ कुटुंबांसाठी सुरक्षितता जाकीट यांची मदत केली. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गोदरेजने मच्छिमारांसाठी प्रशिक्षण, बाजारपेठीय संबंध प्रस्थापित करणे आणि मच्छिमारांसाठी स्व-मदत गट उभारणे अशी कामे केली. या स्व-मदत गटाच्या माध्यमातून लाभार्थींना एकूण प्रकल्प खर्चातील ५०% रक्कम उभारणे शक्य झाले।


गोदरेज अँड बॉयसच्या पाठबळाआधी मच्छिमार ट्यूबच्या सहाय्याने मासेमारी करत होते. तेव्हा दिवसाला केवळ ३-५ किलो मासेमारीच व्हायची आणि दिवसाला साधारण ३००-४०० रुपये मिळायचे. पण आता ते दिवसाला १०-१५ किलो मासे पकडू शकतात आणि त्यांची कमाईसुद्धा दिवसाला ८००-१००० रुपये इतकी वाढली आहे. गोदरेज अँड बॉयसमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठाच बदल घडलेला असून मासेमारीची जाळी, नौका आणि सुरक्षितता जाकिटे यांच्या अतिरिक्त वापरामुळे मासे पकडण्यामधला धोका बराच कमी झाला आहे. आपल्या कामकाज केंद्राच्या आजूबाजूच्या भागातील विविध समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी गोदरेज अँड बॉयस कार्यरत आहे. महाराष्ट्रातील शिरवळ येथील त्यांच्या कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या या मच्छिमार समाजासाठी गोदरेज सीएसआर उपक्रमाच्या अंतर्गत त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला आहे. उपक्रमाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी गोदरेज अँड बॉयसने अॅवॉर्ड या सातारा येथील ना नफा तत्वावर काम करणाऱ्या सामाजिक स्वयंसेवी संस्थेबरोबर भागीदारी केली आह।

गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कॉ. ली. विषयी:
गोदरेज अँड बॉयस (जी अँड बी), गोदरेज समूह कंपनीची स्थापना १८९७ मध्ये झाली आणि उत्पादनाच्या माध्यमातून कंपनीने भारताच्या आत्मनिर्भर प्रवासात मोलाचे योगदान दिले आहे. जी अँड बी ने जगातील पहिल्या स्प्रिंग विरहीत कुलुपाचे पेटंट घेतले असून तेव्हापासून सुरक्षा, फर्निचर, अवकाश यांच्यापासून पायाभूत सुविधा आणि संरक्षण अशा विविधांगी १४ व्यवसाय क्षेत्रात आपले उद्योगविश्व विस्तारले आहे. गोदरेज हा भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँडपैकी एक असून दिवसाला जगभरात १.१ अब्ज हून अधिक ग्राहकांना सेवा पुरवीत आहे।


Bundelikhabar

Related posts

ट्रूक ने लॉन्च किया उत्कृष्ट और आकर्षक ‘एफ1 ईयरबड्स’

Bundeli Khabar

ओरिफ्लेम का माइंड एंड मूड एसेंशियल ऑयल कलेक्शन

Bundeli Khabar

मिलेनियल्स निवेशकों का टैक्स बचत और दीर्घकालिक निवेश पर जोर : पेटीएम मनी

Bundeli Khabar
error: Content is protected !!