23.6 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210904 WA00053
महाराष्ट्र

भिवंडीत एक मजली घर कोसळून एक ठार तर आठ जण जखमी

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी शहरातील आजमी नगर,टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत।


मोहम्मद तबरेज अंसारी (४० रा. आजमीनगर ,झोपडपट्टी) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.तर मो.हसीम शेख (३५),सुबेदा खातून (५५ ),अमिना अन्सारी (४५ ),रोशन बानो (३०), जारा अब्दुल कलाम (१२), रोजी फातिमा (१४), जिकरा अंसारी (१४ ),आयशा शब्बीर अंसारी (५५ )अशी जखमींची नावे आहेत.शहरातील आजमीनगर,टिपू सुलतान चौक परिसरात शासनाने १९८४ च्या दंगलीत विस्थापित झालेल्या नागरिकांना १० x १० च्या मोजमापाचे घर शब्बीर मो.इब्राहिम अंसारी यांना राहण्यासाठी दिले होते.मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजूबाजूला शब्बीर यांनी घराच्या गॅलेरीवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर भाजीपाल्याची दुकाने आहेत.मार्केट परिसर व दुकाने असल्याने या ठिकाणी नागरिक सामान खरेदीसाठी आले होते।

IMG 20210904 WA00052

त्यावेळी वाढीव गॅलेरी व घराचा भाग सामान खरेदीसाठी आलेल्या मोहम्मद तबरेज अंसारी (४० रा.आजमीनगर ) व अन्य नागरिकांवर कोसळला.त्यामुळे कोसळलेल्या घराच्या मलब्याखाली मो.तबरेज दबला गेल्याने तो जागीच ठार झाला तर आठ जण जखमी झाले आहेत.यातील गंभीर जखमी झालेल्या हाशीम आणि सुबेदा यांना कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अमिना यांच्या डोक्याला व रोशन हिच्या पायाला व पाठीला फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत।

उर्वरीत जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.विशेष म्हणजे या दुर्घटनेत अंसारी कुटुंबीय सकाळची न्याहरी करण्यासाठी किचन रूममध्ये बसले होते.त्यामुळे घरातील कोणीही जखमी झाके नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेले नागरिक व महिला दुर्घटनेत मयत व जखमी झाले आहेत.जखमींना शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.घटनास्थळी अग्निशमन दल,पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होत मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे।


Bundelikhabar

Related posts

राष्ट्रीय मानव अधिकार अपराध एवम् भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो” की मनाई गई तीसरी वर्षगाँठ

Bundeli Khabar

अंजुर ,माणकोळी ,दिवे अंजुर गावातील सिमेंट प्लांट बंद करण्याबाबत मनिष तरे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Bundeli Khabar

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

Bundeli Khabar
error: Content is protected !!