पंधरा गावातील महिला अन्नपाण्याविना बेचैन…
तहसीलदार यांचा कानाडोळा
संभाजी मोरे/महाराष्ट्र
कोंकण : कोकणामध्ये २२ जुलैपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले त्याचप्रमाणे खेड तालुक्यातील अनेक गावांमधील नदी-नाल्यांचे पूल वाहून गेल्याने शेतकरी बांधव दिशाहीन झाले आहेत त्यातच आज पर्यंत नाही अनेक गावांमध्ये ना रस्ते ना लाईट नदीवर पूल यापेक्षाही पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा अशा चिंतेत असणाऱ्या महिला वर्गामध्ये तालुक्याच्या तहसीलदार यांनी प्रशासनाने आदेश देऊनही काही मदत न केल्याचा राग जनतेमध्ये आहे ।
22 जुलै पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या अनेक घरे दरडीखाली गाडली गेलीत, खेड तालुक्यातील 15 गाव विभागात प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले त्याचबरोबर प्रत्येक गाव वाडी यांच्यामधील नदी नाल्यावरील पूल साकव वाहून गेले रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून रस्त्यावर दरडी कोसळून सर्व मार्ग बंद झालेत. या घटनेने प्रशासन जागे झाले खरे प्राथमिक स्वरूपात मंत्रिमंडळातील मंत्री आमदार जिल्हाधिकारी येत राहिली यावेळी मी खूप मोठे तत्परतेने काम करत आहे अशा पद्धतीने खेड तालुक्याच्या तहसीलदार प्रांताधिकारी सोबत या विभागात ठाण मांडून बसल्या परंतु दरडी कोसळलेल्या पोसरे बौद्धवाडी घरावरील मलबा हटवून मयत व्यक्तींनाबाहेर काढल्यावर तहसीलदारांची जबाबदारी संपल्याचेच दिसून आले, यानंतर पंधरा गाव विभागातील पोसरे चोरवणे सापिर्लि निवे गावांमध्ये मोठमोठ्या दरडी कोसळून पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नदीपात्रात पूर्ण चिखलाने भरून गेलेल्या बघूनही तहसीलदार यांनी येथील ग्रामस्थांना शासनाची कोणत्याही प्रकारे आजपर्यंत मदत केली नाही आजही येथील पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना अन्न पडण्यासाठी मुंबई पुण्यातून येणाऱ्या मदतीची वाट पहावी लागते. जवळ जवळ पंधरा दिवसानंतर महावितरणने तात्पुरत्या स्वरूपात लाइट सुरू केले आहे परंतु सर्वकाही महापुरा मध्ये वाहून गेल्याने शेतकरी स्त्रियांना आपल्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा हाच यक्ष प्रश्न महिला वर्गासमोर आहे . प्रशासन बोलते शुद्ध पाणी प्या पाणी गाळून प्या परंतु गेल्या 22 ते 23 दिवसापासून पंचक्रोशीतील जनता नदी नाल्यातील नैसर्गिक झरे सदृश्य डबक्यातील गढूळ पाणी पिऊन दिवस ढकलत आहे , कोणी दिल्याच्या मदतीवर आपल्या कुटुंबाची दोन वेळ जेवणाची व्यवस्था करीत आहे आज पर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून खेडच्या तहसीलदार यांनी कोणत्याही शेतकऱ्यांची भेट घेतली ना काही मदत केली लाईट नसतानाही आम्ही काळोखात रात्र काढली आहे याचप्रमाणे पुढेही आम्ही कसेतरी कुटुंब चालवू कारण हे सगळं आम्हा महिलांना सोसावा लागत… आमचं कर्मच वाईट असे समजावे का..? कारण तालुक्याच्या महिला तहसीलदार असूनही आम्हाला अन्न पाण्यासाठी वणवण करावी लागते हिच शोकांतिका आहे.
महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत साहेबांनी आदेश देऊनही आज पर्यंत एक लिटर रॉकेल ही मोफत मिळाले नाही उलट प्रत्येक गावात रास्त धान्य दुकानावर आलेले रॉकेल प्रत्येकी 60 रुपये दराने एका कार्डधारकाला फक्त दोन लिटर देण्यात आले, यापेक्षा जास्त केरोसीन हवे असल्यास प्रति लिटर शंभर रुपये मोजावे लागतील असे रास्त दुकान धारक बोलतात, यामुळे सरकारची आणि प्रशासनाची आश्वासनं तालुक्याच्या तहसीलदार कशाप्रकारे पेलतात हे चित्र प्रत्येक गावात दिसत आहेत असो आमच्या महिलांच्या नशिबी अन्य पाण्यासाठी भटकणे असले तरी आम्ही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे।
प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार यांनी अन्न पाणी आणि पिण्याच्या प्रश्न न सोडवल्यास प्रशासनाविरोधात जनता रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही असे महिला भगिनी यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले . ही वस्तुस्थिती खरी नसल्यास आणि तहसीलदार यांनी प्रशासनाच्या माध्यमातून जनतेला काय मदत केली असल्यास समक्ष येऊन जनतेसमोर सांगावे… आजही परिसरातील जनता अन्नपाणी ना वाहतूक व्यवस्था यामुळे काही तीव्र आजार किंवा अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासनच राहील अशाप्रकारे आपला राग व्यक्त करीत चोरवणे गावचे ग्रामस्थ सीताराम उतेकर यांनी सांगितले।