35.3 C
Madhya Pradesh
May 22, 2024
Bundeli Khabar
Home » तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा हद्दीतील रायते गावात वैष्णवी मंदिर परिसरातील ७ ते ८ दुकानें चोरट्यानी फोडली
क्राइम

तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा हद्दीतील रायते गावात वैष्णवी मंदिर परिसरातील ७ ते ८ दुकानें चोरट्यानी फोडली

तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा हद्दीतील रायते गावात वैष्णवी मंदिर परिसरातील ७ ते ८ दुकानें चोरट्यानी फोडली.*
दुकानदारांचे मोठे नुकसान
टिटवाळा पोलिसांना आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान.
नागरिकांत भितीचे वातावरण

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
टिटवाळा : तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा हद्दीतील रायतेगावं दहागाव रोड वरील वैष्णवी मंदिर परिसरातली ७ ते ८ दुकाने चोरट्यांनी फोडून, दुकानातील मिळेल ती वस्तु लंपास केली आहे.
बुधवारी रात्री अंधाराचा फायदा घेऊन एकाच वेळी सर्व दुकानें फोडल्याने, परिसरात प्रचंड दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दुकानदारांनी या अगोदर चोऱ्यांची माहिती पोलिसांना कळवळी होती.अशा घटना या परिसरात नेहमी घडतात. असे सामाजिक कार्यकर्ते राम सुरोशी यांनी सांगितले।


आम्ही ग्रामस्थांनी मागील सहा महिन्यापूर्वी पोलिसांना याबाबत लेखी निवेदन दिले होते. या परीसरात चोरीच्या घटना वारंवार होत असुन पोलीस दुर्लक्ष करतात. कल्पना देऊनही पोलिसांनी गस्त वाढविली नाही सध्या पोलीस स्टेशन मध्ये मनुष्य बळ कमी असल्याचे एका कर्तव्य दक्ष पोलिसाने नाव न सांगण्याच्या अटीवर गावकऱ्यांना सांगितले असल्याचे राम सुरोशी यांनी सांगितले।


बुधवारी रात्री या चोरीच्या घटनेची प्रचीती रायते ग्रामस्थांना आली. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची पोलिसांनी योग्य दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन टिटवाळा पोलिसांना आहे. पोलिसांनी चोरांचा लवकरात लवकर शोध लावावा व आम्हांला न्याय मिळून दया अशी मागणी दुकानदार द्वारकानाथ भोईर, नारायण सुरोशी, आकाश भोईर, राजेश सुरोशी, अरुण पवार व ज्ञानेश्वर सुरोशी यांनी केली आहे.
वारंवार चोरीच्या घटना होत असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांना गजाआड करणे गरजेचे आहे।

Related posts

हत्या: पत्थर से कुचल कर महिला की हत्या

Bundeli Khabar

चाकू अड़ाकर लूट करने वाले लुटेरे सीसी टीवी की मदद से गिरफ्तार

Bundeli Khabar

छतरपुर: पुलिस ने अपराधियों पर की ताबड़तोड़ कार्यवाही

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!