25.1 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20210807 WA0027
मध्यप्रदेश

फेडेक्स एक्सप्रेसने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अत्यावश्यक गरजेच्या वस्तू पोहोचवल्या

Bundelikhabar

फेडेक्स एक्सप्रेसने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अत्यावश्यक गरजेच्या वस्तू पोहोचवल्या
युनायटेड वे मुंबईच्या आपत्ती प्रतिसाद प्रयत्नांमुळे रायगड जिल्ह्यातील २९०० पेक्षा जास्त लोकांना पोहोचवल्या जवळपास १४ टन खाद्यपदार्थ व स्वच्छतेसाठी आवश्यक वस्तू

महाराष्ट्र / संतोष साहू
मुंबई : फेडेक्स कॉर्पची (एनवायएसई: FDX) उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी फेडेक्स एक्सप्रेस महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत पुरवण्याच्या युनायटेड वे मुंबईच्या प्रयत्नांमध्ये सहयोग देत आहे. फेडेक्स एक्सप्रेसने मुंबईहून रायगड जिल्ह्यातील महाड येथे १४ टनांपेक्षा जास्त खाद्यपदार्थ व स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू पोचत्या केल्या आहेत.
अचानक उद्भवलेल्या संकटामुळे अनेक लोकांच्या जीवनावर खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो याची FedEx Express ला पुरेपूर जाणीव आहे. हे मदतकार्य कंपनीच्या FedEx Cares “डिलिव्हरिंग फॉर गुड” उपक्रमाचा एक भाग आहे. यामध्ये फेडेक्स एक्सप्रेस ही कंपनी आपले जागतिक नेटवर्क व अतुलनीय लॉजिस्टिक्स नैपुण्ये यांचा वापर करून आपत्तीच्या काळात गरजेनुसार अत्यावश्यक मदत पुरवणाऱ्या संघटनांना मदत करते।


फेड एक्स एक्सप्रेसच्या इंडिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष मोहमद सायेघ यांनी सांगितले, “महाराष्ट्रातील पुरामध्ये नुकसान झालेल्यांबद्दल आमच्या मनात संपूर्ण सहानुभूती आहे आणि म्हणूनच आम्ही पूरग्रस्त गरजूंना अत्यावश्यक वस्तू पुरवण्याच्या युनायटेड वे मुंबईच्या प्रयत्नांमध्ये साथ देत आहोत.”।


युनायटेड वे मुंबईचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जॉर्ज ऐकारा यांनी सांगितले, “गरजूंपर्यंत मदतीची किट्स पोहोचवण्यासाठी FedExने त्यांचा नेटवर्कचा उपयोग करवून दिला याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. पुरामध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना आपले जीवन पुन्हा सुरु करता यावे यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू या किट्समध्ये आहेत, ज्या विविध कॉर्पोरेट साथीदारांच्या मदतीने उभ्या करण्यात आल्या आहेत. किट्सच्या वाहतुकीवरील खर्चात बचत झाल्याने आम्हाला किट्सची संख्या वाढवण्यात खूप मोठी मदत मिळाली आणि त्यामुळे आता अधिक जास्त कुटुंबांना मदत मिळाली आहे.”।


Bundelikhabar

Related posts

आज से खुलेंगे बाजार सुबह 6 से शाम 7 तक

Bundeli Khabar

कोरोना अनुकंपा नियुक्ति एवं अनुग्रह राशि के प्रकरणों के निराकरण हेतु 9 जुलाई को आयोजित होगा शिविर : कलेक्टर सागर

Bundeli Khabar

जिले भर में हर्षोल्लास से मनाया गया गणतंत्र दिवस

Bundeli Khabar
error: Content is protected !!