15.4 C
Madhya Pradesh
December 12, 2024
Bundeli Khabar
Home » मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये, आता एका स्थानासाठी तीन संघांत चुरस
महाराष्ट्र

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये, आता एका स्थानासाठी तीन संघांत चुरस

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिला प्रीमियर लीग मधील लीग सामने अंतिम टप्प्यात आहेत. तीन संघांचे प्रत्येकी दोन सामने आणि दोन संघांमध्ये प्रत्येकी एक सामना आहे. पाचपैकी तीनच संघ प्लेऑफमध्ये जाणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने आपली जागा पक्की केली आहे. आता एका जागेसाठी तीन दावेदार आहेत. यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्सला अजूनही संधी आहे.

स्पर्धेच्या नियमानुसार आघाडीवर असलेल्या संघाला मोठा फायदा होणार आहे. ती थेट अंतिम फेरीत पोहोचेल. त्याच वेळी, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघामध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत अव्वल मानांकित संघाशी खेळेल.

*आता जाणून घेऊ कोणत्या संघासाठी काय समीकरणे आहेत*

मुंबई इंडिअन्स : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. सहा सामन्यांतून पाच विजयांसह त्यांचे १० गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सपेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. दिल्लीचे इतक्या सामन्यांतून आठ गुण आहेत. मुंबईने दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचे १४ गुण होतील. आणि दिल्लीने दोन्ही सामने जिंकल्यास दिल्लीचे १२ गुण होतील. विशेष म्हणजे दोन्ही संघांमध्ये अव्वल स्थानासाठी चुरशीची स्पर्धा आहे. अशा स्थितीत दिल्ली जिंकली तर मुंबईवरील दडपण वाढेल. या सामन्यातील विजयी संघाला अव्वल स्थानावर राहण्याच्या मोठ्या आशा आहेत.

दिल्ली कॅपिटल्स : दिल्ली कॅपिटल्सचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. सहा सामन्यांत त्याचे आठ गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्सने चार सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. तिने दोन्ही सामने जिंकल्यास तिचे १२ गुण होतील. अव्वल स्थान गाठण्याच्या आशा कायम राहतील, पण मुंबई इंडियन्सच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.

यूपी वॉरियर्स : एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील यूपी वॉरियर्स संघाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. सहा सामन्यांत तीन विजयांसह त्याचे सहा गुण आहेत. उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. त्यांना गुजरात जायंट्स किंवा दिल्ली कॅपिटल्स यापैकी एकाला हरवले पाहिजे, असे थेट समीकरण त्याच्यासमोर आहे.

रॉयल चैलेंजर्स बैंगलोर : पहिल्या पाच सामन्यातील पराभवानंतर आरसीबी संघाने दमदार पुनरागमन केले आहे. स्मृती मंधानाच्या आरसीबीने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांचे सात सामन्यांत चार गुण आहेत. आरसीबीला आता फक्त एकच सामना त्यांच्यासाठी खेळायचा आहे. त्यांना पुढील फेरी गाठायची असेल तर यूपी वॉरियर्स संघ दोन्ही सामन्यात हरला पाहिजे यासाठी आरसीबीला प्रार्थना करावी लागेल. यासह, तो चांगल्या नेट रनरेटसह पुढे जाऊ शकतो.

गुजरात जाएंट्स : गुजरात जाएंट्स संघाचे सात सामन्यांतून दोन विजयांसह चार गुण आहेत. त्यांचेही समीकरण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सारखेच आहे. त्यांना शेवटच्या सामन्यात यूपी वॉरियर्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल. याशिवाय यूपीचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हरेल अशी प्रार्थनाही करावी लागेल. त्याचवेळी, मुंबईने आरसीबीवर मात केली पाहिजे.

Related posts

भिवंडीत एसटी बस चालक व वाहक यांचा संप सुरु

Bundeli Khabar

ट्रेन के नीचे गैप में गिर गई गर्भवती महिला, आरपीएफ जवान ने बचाई जान

Bundeli Khabar

स्पष्टवक्त्या, निरलस सेवा वृत्तीच्या या निष्ठावान कला तपस्व्यास माझी महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रद्धांजली! – सुधीर मुनगंटीवार

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!