39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » मुंबईत १० जानेवारीपासून कला प्रदर्श
महाराष्ट्र

मुंबईत १० जानेवारीपासून कला प्रदर्श

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कला संचालनालयामार्फत ६२ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) २०२२-२३ आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंगळवार १० जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणार आहे. हे प्रदर्शन १० ते १६ जानेवारी, २०२३ या कालावधीत होणार आहे. प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे, असे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रदर्शनाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित राहणार आहेत. सन २०२०-२१ यावर्षीचा “कै. वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार” शिल्पकार राम सुतार तसेच ज्येष्ठ कलाकार प्रमोद रामटेके यांचा व ६२ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा शासनाच्या वतीने सत्कार समारंभ होणार आहे.

*पारितोषिक प्राप्त कलाकार*
सुरभी कांचन गुळवेलकर (रेखा व रंगकला), प्रतिक बळीराम राऊत (रेखा व रंगकला), प्रसाद सुनील निकुंभ (रेखा व रंगकला), विवेक वसंत निंबोळकर (रेखा व रंगकला), अभिजित सुनील पाटोळे (रेखा व रंगकला), वैभव चंद्रकांत नाईक (रेखा व रंगकला), रोहन सुरेश पवार (शिल्पकला), अजित महादेव शिर्के (शिल्पकला), राहुल मच्छिंद्र गोडसे (उपयोजित कला), श्वेता श्याम दोडतले (उपयोजित कला), अनूज संजय बडवे (उपयोजित कला), दीक्षा संदेश कांबळे (उपयोजित कला), विजय रामभाऊ जैन (उपयोजित कला), किन्नरी जितेंद्र तोंडलेकर (मुद्राचित्रण), राकेश रमेश देवरुखकर (दिव्यांग विभाग) या कलाकारांचा पारितोषिक व रक्कम ५० हजार रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Related posts

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

Bundeli Khabar

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने चार कोटी 60 लाख 50 हजार किंमतीचा तब्बल तीन हजार 70 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा केला जप्त

Bundeli Khabar

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये, आता एका स्थानासाठी तीन संघांत चुरस

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!