26.8 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20230104 WA0009
महाराष्ट्र

प्रसाद खापर्डे यांना यंदाचा गानसरस्वती पुरस्कार जाहीर

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २०२२ सालचा गानसरस्वती पुरस्कार हा नाशिकचे प्रतिथयश गायक प्रसाद खापर्डे यांना जाहीर करण्यात आला आहे. स्वर्गीय गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी गानसरस्वती पद्मविभूषण किशोरीताईंच्या स्मरणार्थ पुरस्कृत केलेल्या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये व मानपत्र असे आहे. हा वार्षिक पुरस्कार ५० वर्षे वयाच्या आतील शास्त्रीय कंठसंगीताच्या प्रतिथयश कलाकारास दरवर्षी दिला जातो. प्रसाद खापर्डे हे रामपूर-सहस्वान घराण्याचे गायक असून सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उस्ताद राशिद खान यांचे शिष्य आहेत.

पुरस्काराविषयी अधिक माहिती www.gspuraskar.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कार समारोह आणि श्री. खापर्डे यांचे गायन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात होईल. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Bundelikhabar

Related posts

अभिनव अभ्यासक्रमाचा कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रारंभ

Bundeli Khabar

स्वातंत्र्यदिना निमित्त कल्याण स्टेशनवर शोधमोहीम सुरू , स्टेशन आणि मेल गाड्यांव्यतिरिक्त संशयास्पद व्यक्तींवर बारीक नजर , तर डॉग स्कॉटची घेतली मदत

Bundeli Khabar

भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या सदस्य सचिवपदी डॉ. उमेश अशोक कदम

Bundeli Khabar
error: Content is protected !!