Bundeli Khabar
Home » ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक
महाराष्ट्र

ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक

मालावणी – मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळ आणि अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळ यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यामार्फत आयोजित केलेल्या सन – २०२२ च्या ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार’ स्पर्धेचा निकाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी आज (दिनांक ०८ सप्टेंबर, २०२२) जाहीर केला. पालिका मुख्यालयातील नवीन विस्तारित इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील परिषद सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान हा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रसंगी उप आयुक्‍त (परिमंडळ – २) तथा गणेशोत्‍सव समन्‍वयक श्री. रमाकांत बिरादार व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेचे पहिले पारितोषिक हे ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ यांना घोषित करण्यात आले. या गणेश मंडळाद्वारे ‘सुगम्य भारत’ या संकल्पनेवर आधारित जनजागृतीपर देखावा उभारण्यात आला होता. ज्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तिंना सार्वजनिक जीवनात वावरताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना या संबंधित बाबींचा समावेश आहे. याच स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक मालावणी – मालाड (पश्चिम) येथील युवक उत्कर्ष मंडळास घोषित करण्यात आले. या मंडळाने आपत्कालीन व्यवस्थापन व उपाययोजना या विषयीचा प्रत्ययकारी देखावा उभारुन जनजागृती साधली आहे. तर तिसरा पुरस्कार हा सात बंगला, अंधेरी (पश्चिम) परिसरातील स्वप्नाक्षय मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव यांना जाहीर करण्यात आला. या मंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील देखावा उभारला आहे.

सदर तिनही गणेश मंडळांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्तिंची स्थापना करण्यासोबतच पर्यावरणपूरक बाबींचा वापर करुन देखावे उभारले आहेत. तसेच यंदाची शाडू मातीची सर्वोत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती कांजूरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास घोषित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक हे विक्रोळी (पश्चिम) परिसरातील बालमित्र कला मंडळ यांच्या श्रीगणेश मूर्तिसाठी, तर सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक हे घोटकोपर (पूर्व) परिसरातील रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांना घोषित करण्यात आले. या व्यतिरिक्त विविध गटांमधील ८ पारितोषिकांचीही घोषणा आज करण्यात आली. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या २० गणेशोत्सव मंडळांना विशेष प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात येणार आहे. या गणेश मंडळांची नावे देखील आज घोषित करण्यात आली. ‘श्रीगणेश गौरव स्पर्धा – २०२२’ चा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे –

*प्रथम पारितोषिक* (रु.७५,०००/-)

पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – १३

*द्वितीय पारितोषिक* (रु.५०,०००/-)

युवक उत्कर्ष मंडळ, माऊंट मेरी शाळेच्या बाजूला, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई – ९५

*तृतीय पारितोषिक* (रु.३५,०००/-)

स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, ग्लोरिया सोसायटी जवळ, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ५३

*सर्वोत्कृष्ट मूर्ती* (रु.२५,०००/-)

बालमित्र कला मंडळ, विजया हाऊस, स्टेशन मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ८३

*सर्वोत्कृष्ट नेपथ्य* (रु.२०,०००/-)

रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री. रामदूत हनुमान मंदिरा शेजारी, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ७७

*दोन उत्तेजनार्थ पारितोषिके* (प्रत्येकी रु.१०,०००/-)

१) नवतरुण मित्रमंडळ, गांवदेवी मंदीर, गांवदेवी नगर, कोकणी पाडा, दहिसर (पूर्व), मुंबई – ६८

२) विकास मंडळ (साईविहार), साईविहार मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई – ७८

*•शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती – पारितोषिके (रु.२५,०००/-)*

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर, कांजूरमार्ग, कांजूरगांव (पूर्व), मुंबई – ४२

*प्‍लास्‍टीक बंदी / थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः* (प्रत्येकी रुपये १०,०००/-)

१) श्री हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग, धारावी, मुंबई – १७

२) गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकी, मुंबई – ३३

*अवयवदान / आरोग्य जागृतीः*

पारितोषिक रु.१५,०००/-
ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग पटांगण, माझगांव, मुंबई – १०

*प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे*

*उत्‍कृष्‍ट मूर्तिसाठीः*

१. बाळाशेठ मडुरकर (बी. एम.) मार्ग, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवराज भवन क्रमांक २ व प्राईम प्लाझा जवळ, बी. एम. मार्ग, प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड), मुंबई

२. श्री गणेश क्रीडा मंडळ, काजुवाडी, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई

३. रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ, काळाचौकी

४. खारवा गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ, गिरगांव

*नेपथ्यासाठीः*

१. साईनाथ मित्र मंडळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई

२. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती, अंधेरी (पश्चिम), मुंबई

३. लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ, मुंबई

४. सुभाष लेन गणेश साई सेवा मंडळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई

*प्रबोधनासाठीः*

१. इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब, धारावी, मुंबई

२. अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई

३. प्रतिक्षा नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शीव – कोळीवाडा, मुंबई

४. श्री श्रद्धा मित्रमंडळ, दहिसर (पूर्व), मुंबई

*पर्यावरण विषयक जनजागृतीसाठीः*

१. शांतीनगर रहिवाशी संघ, मुलुंड (पश्चिम), मुंबई

२. ओम श्री सिद्धीविनायक मित्रमंडळ, साकीनाका, मुंबई

३. साईनाथ मित्रमंडळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई

४. सार्वजनिक उत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई

*सामाजिक कार्यासाठीः*

१. बाळ गोपाळ मित्रमंडळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई

२. निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गिरगांव, मुंबई

३) कन्नमवार नगर – १ उत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई

४) सार्वजनिक गणेशोत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सांस्कृतिक मानबिंदू असलेला गणेशोत्सव सोहळा मुंबई महानगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या अंतर्गत घरगुती स्तरावर करण्यात येणाऱ्या श्रीगणेश पुजनासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे देखील गणेशोत्सव साजरा करीत असतात. या सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लहान-थोर मंडळी एकत्र येत असतात. ही बाब लक्षात घेऊन नागरी सेवा-सुविधा विषयक व जनहित विषयक संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. तथापि, सन २०२० व सन २०२१ मध्ये कोविड साथरोगाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, आता कोविड रुग्णांचे कमी झालेले प्रमाण व बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रभावीपणे राबविण्यात आलेली लसीकरण मोहीम ही बाब लक्षात घेऊन यंदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेची माहिती अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहोचावी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, या उद्देशाने या स्पर्धेबाबत वृत्तपत्रीय जाहिराती देण्यात आल्या. तसेच संकेतस्थळ, समाजमाध्यमे इत्यादींद्वारे देखील माहिती प्रसारित करण्यात आली. श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित विविध बैठकांमध्ये देखील या स्पर्धेची माहिती देण्यात आली. या बैठकांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समन्वय संस्थांची उपस्थिती असायची.

जनसंपर्क विभाग आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे हे ३३ वे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेत बृहन्मुंबईतील ५३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. या गणेशोत्सव मंडळांच्या प्राप्त अर्जांची ३ गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. या अंर्तगत पहिल्या फेरीमध्ये ‘अ’ गटाद्वारे १७ सार्वजनिक गणेश मंडळे, ‘ब’ गटाद्वारे १८ सार्वजनिक गणेश मंडळे व ‘क’ गटाद्वारे १८ सार्वजनिक गणेश मंडळे यांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करण्यात आले. या अंतर्गत निर्धारित गुणांकन पद्धतीनुसार गुण देऊन अंतिम फेरीसाठी १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात आली.

या निर्धारित गुणांकन पद्धतीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय, विषयाची मांडणी, मंडळाने केलेली सामाजिक व विधायक कार्ये, परिसर स्वच्छता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध मोहिमांमध्ये – कार्यांमध्ये नोंदविलेला सहभाग, पर्यावरण पूरकता, जनहित संदेशांचा वापर इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात.

दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळपासून ते दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटेपर्यंत आयोजित अंतिम फेरीदरम्यान परीक्षक मंडळाने अंतिम फेरीतील सर्व १७ गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. ज्यानंतर श्रीगणेश गौरव स्पर्धेचा अंतिम निकाल बंद पाकिटात व स्वाक्षरीसह महानगरपालिका प्रशासनाकडे सादर केला. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी या स्‍पर्धेचा निकाल आज जाहीर केला आहे.

या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्रा. श्री. नितीन केणी, पाटकर महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. श्री. आनंद पेठे, जे. के. ऍकेडमी ऑफ आर्ट ऍण्ड डिझाईनचे प्रा. श्री. नितीन किटुकले, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सदस्य श्री. विकास माने, बृहन्‍मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे सदस्‍य श्री. प्रदीप मुणगेकर, बृहन्‍मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाचे सरचिटणीस (पत्रकार) श्री. श्रीरंग सुर्वे, गणेशोत्सव समन्वय समितीचे सदस्य श्री. भूषण वाईरकर, मनपा कला शिक्षण विभागाचे कला प्राचार्य श्री. दिनकर पवार, जनसंपर्क खात्याचे माजी कर्मचारी श्री. गणेश गोसावी, समन्‍वय समिती प्रतिनिधी, वृत्तपत्र प्रतिनिधी, महानगरपालिका शिक्षण खात्याच्या कला विभागाचे प्रतिनिधी यानुसार ९ तज्ज्ञ परीक्षकांनी परिक्षणाचे कामकाज पाहिले.

Related posts

गायों की हो रही मौत पर संग्राम सिंह ने 11 मोबाइल एम्बुलेंसस सुविधाओ को दी हरी झंडी

Bundeli Khabar

विधानसभा अध्यक्ष निवड आज तरी होणार का

Bundeli Khabar

वर्षातील बहुप्रतीक्षित असलेला पुरस्कार सोहळा ह्या डिसेंबरमध्ये

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!