किशोर पाटील
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कशेळी, काल्हेर, कोपर, केवणी दिवे, सुरई अंजुर या खाडी किनारी सक्शन पंपद्वारे व बार्ज द्वारे अनधिकृतरित्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफिया विरुद्ध भिवंडीचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे व तहसीलदार अधिक पाटील यांचे नेतृत्वाखालील महसूल पथकाने धडक कारवाई करून सक्शन पंप, बार्ज व उत्खनन केलेले रेती असा सुमारे रुपये १४ लक्ष मात्रचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, भिवंडी तालुक्यातील रेती माफियांचे प्रस्थ प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे या रेती माफिया विरुद्ध कारवाई करण्याच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे व तहसीलदार यांचेकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल वाघचौरे यांनी घेऊन शासनाचा महसूल बुडवून अनधिकृतरीत्या रेती उत्खनन करणारे विरुद्ध कारवाई करण्यासाठी भिवंडीचे अप्पर मंडळ अधिकारी व खारबाव सर्कलचे मंडळ अधिकारी व इतर महसूल कर्मचारी यांनी मौजे सुरई व मौजे कोन येथील खाडीपात्रात अनधिकृतरीत्या उत्खनन करणार्याविरुद्ध कारवाई करीत रेती, सक्शन पंप व बार्ज असा १४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून सदर रेती माफिया विरुद्ध भिवंडीतील नारपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिक तपास करीत आहेत।