31.7 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » आपले अधिकार मिळविण्यासाठी प्रथम कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे: डॉ.दिपेश पष्टे
महाराष्ट्र

आपले अधिकार मिळविण्यासाठी प्रथम कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे: डॉ.दिपेश पष्टे

१० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन सर्व देशांमध्ये अधिकारांची अंमलबजावणी व माहिती होण्यासाठी जनजागृती म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने “आपले मानवाधिकार फाउंडेशन” मार्फत आ.लं.चंदावरकर कनिष्ठ महाविदयालय, वाडा, जि. पालघर या ठिकाणी “आपले संविधान आपला आत्मसन्मान” या उपक्रम अंतर्गत मानवाधिकार दिन साजरा करण्यांत आला.
आपले संविधान आपला आत्मसन्मान या विषयाच्या अंतर्गत मानवाचे हक्क, अधिकार, कर्तव्य, जबाबदारी या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन संचालक डॉ.दिपेश पष्टे यांनी केले. कॉलेज जीवनातच आपल्याला सर्व कर्तव्याची आणि अधिकारांची जाणीव व्हावी म्हणून विशेष करून कनिष्ठ महाविद्यालयीन तरुण-तरुणींन हक्क, अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव करून देऊन जनजागृतीचे कार्य तरुणाई जोमाने करू शकते असा विश्वास व संदेश डॉ. पष्टे यांनी यावेळी व्यक्त केला. शालेय व महाविद्यालयीन जीवनातच शिस्त व जबाबदारी ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते असे प्राचार्य व उपप्राचार्य यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन आपले मानवाधिकार फाऊंडेशन पालघर जिल्हा कार्यकारणी कडून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दिपेश पष्टे, युवा समाजसेवक दिवेश पष्टे व प्राचार्य पाटील सर, उपप्राचार्य मोकाशी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी आपले मानवाधिकार फाउंडेशन च्या माध्यमातून आ.लं. चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पाटील सर व उपप्राचार्य व्ही. टी. मोकाशी सर यांना भारतीय संविधान उद्देशिका देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविकता दिवेश पष्टे यांनी करताना आपले मानवाधिकार फाऊंडेशन मार्फत मानवी हक्कांसाठी करत असलेल्या कार्याचे विश्लेषण केले तसेच युवकांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपले मानवाधिकार फाउंडेशन चे पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद खरात यांनी केले. यावेळी संस्थेचे जिल्हा प्रमुख सागर पाटील, वाडा तालुका व्यवस्थापक राजू ठाकरे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवक, आरोग्य अधिकारी, प्राध्यापक व रुग्णमित्र आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

श्रमिकों के लिए सम्राट अभय थोराट का ई श्रम कार्ड पंजीकरण अभियान

Bundeli Khabar

मातृभूमि सेवार्थ फाउंडेशन द्वारा आयोजित हुआ फिल्म ‘द कश्मीर फाइल्स’ का शो

Bundeli Khabar

नंदुरबार जिल्ह्यातील परीवर्धा येथील गोविंद श्रीपत पाटील शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!