29.9 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » टिटवाळा येथे निलेश सांबरे यांच्या हस्ते स्पर्धापरीक्षा अभ्यासिका व वाचनालयाचे उदघाटन
महाराष्ट्र

टिटवाळा येथे निलेश सांबरे यांच्या हस्ते स्पर्धापरीक्षा अभ्यासिका व वाचनालयाचे उदघाटन

कल्याण : टिटवाळा येथे निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेला अधिकारी बनवणारी सामाजिक संघटना म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळखली जाते. या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम केले जातात. याच संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून टिटवाळा येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व वाचनालय तसेच एका तरुण युवकाच्या सलूनचे उद्घाटन निलेश सांबरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मराठी तरुणांनी उद्योजक व उच्चपदस्थ अधिकारी व्हावे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करावे असे प्रतिपादन वाचनालयाचे उद्घाटन करताना व्यक्त तसेच एका तरुण कुणाल खिसमतराव यांच्या टिटवाळा येथील सलूनच्या उदघाटन जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संपादक निलेश सांबरे यांच्या हस्ते झाले.
भारतरत्न डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपतीच्या आशीर्वादाने टिटवाळा नगरीत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ३८ व्या यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उदघाटन समारंभ मोठ्या उत्साहात टिटवाळा येथे निलेश सांबरे यांच्या हस्ते संपन्न झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते टिटवाळा येथे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे हे उपस्थित राहणार असल्यामुळे टिटवाळा परिसरातील विद्यार्थी व युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. या वेळी मराठी तरुण उद्योजक बनत आहे याचं खूप समाधान वाटत आहे. आज पिकविणारा आणि विकणारा हा आपलाच स्थानिक तरुण असला तर निश्चितच समाज एका वेगळ्या दिशेने वाटचाल करेल आज अनेक तरुण छोटे मोठे उद्योग करत आहेत त्यांना काही अडचण असल्यास निश्चितच जिजाऊ संस्था त्यांच्या सोबत उभी राहील. मराठी युवकांनी जास्तीत जास्त अभ्यास करून स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करून उच्चपदस्थ अधिकारी व्हावेत असे मत निलेश सांबरे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे, मोनिका पानवे, हरेश पष्टे, सुनील लकडे, विजय पाटील, संदीप तरे, आदेश चौधरी, अमोल जाधव, प्रवीण चौधरी, चेतन शेलार, निखिल सुरोशी, गणेश सांबरे, जय दादा, अनिल पवार, संजय पारेकर, भगवान सुरोशी, सागर वाकडे, विकी टेभे व आदी जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

मैक्सहब ने पाम एवी-आईसीएन एक्सपो 2022 में पेश किए इंटरैक्टिव समाधान

Bundeli Khabar

केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने किया ‘द लाइब्रेरी कैफे’ लॉन्च

Bundeli Khabar

विधायिका भारती लावेकर ने किया ‘कैमराबाज़’ चैनल का उद्घाटन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!