31.7 C
Madhya Pradesh
May 20, 2024
Bundeli Khabar
Home » महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आमदार किनीकरांसह ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्रालयात धडक
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी आमदार किनीकरांसह ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्रालयात धडक

किशोर पाटील/महाराष्ट्र
ठाणे : महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करणेसाठी व माहिती घेण्यासाठी अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ बालाजी किणीकर व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काल मंत्रालयातील शिक्षण व वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
१) १ नोव्हेंबर दोन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतरांना जुनी पेन्शन याबाबत २दिवसांपूर्वी वित्त विभागाच्या मीटिंगमध्ये काय निर्णय झाला याबाबत व त्वरित मंत्रिमंडळामध्ये माहिती सादर करून जुनी पेन्शन मंजूर करावी
२) राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकांच्या वेतनश्रेणीतील व कालबद्ध पदोन्नतीमधील वेतनत्रुटी दूर करण्याबाबत
३) सातव्या वेतन आयोगाप्रमाणे रजा रोखीकरण शालेय शिक्षण विभागाचा जीआर जाहीर करण्याबाबत
४) अघोषित शाळांना अनुदान देण्यासंदर्भात वित्त विभागाने निधीबाबत कोणती तरतूद केलेली आहे
५) ज्युनियर कॉलेज वाढीव त्यांची माहिती वित्त भागापर्यंत आलेली आहे की नाही ?
*६) विद्यार्थी संख्येमुळे कमी झालेल्या अंश:त अनुदानित शाळेतील सरप्लस शिक्षकांच्यासमायोजनाबाबत.
इत्यादी विषयांवर चर्चा झाली तसेच मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची भेट घेण्याच्या उद्देशाने आमदार बालाजी किणीकर व ज्ञानेश्वर म्हात्रे मंत्रालयात गेले होते ,मात्र काल वेळ मिळाली नाही. पुढील आठवड्यात ही भेट होण्याची शक्यता आहे . यावेळी निवेदनात दिलेले प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाणार आहे.
सोबत महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा संघटनेचे अध्यक्ष श्री भरत जगताप, कार्याध्यक्ष श्री खडके, राज्य उपाध्याय श्री गोपीचंद कुकडे,श्री शिवाजी शिंदे, श्री भगवान गोसावी, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संजय बांगर, श्री विजय ब्राह्मणकर उपसचिव मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री दिपक सटाले, मुंबई जिल्हा कोषाध्यक्ष श्री रणजित पाटील, कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी श्री पाटील उपस्थित होते.

Related posts

आने वाले समय में बॉलीवुड में बंगाली बाला लोपामुद्रा साहा का जादू चलेगा

Bundeli Khabar

लेक लाडकी अभियानातर्फे भारत गौरव राष्ट्रचेतना पुरस्कार २०२२ साठी अावाहन

Bundeli Khabar

परहित चेरिटेबल सोसायटी के अध्यक्ष विशाल कुमार गुप्ता द्वारा राशन वितरित

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!