39.3 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकारी आणि पिडीताच्या कुटुंबियांची घेतली भेट, आरोपींच्या विरोधात चार्जशीट लवकर दाखल करून पीडिताच्या शिक्षणाची व्यवस्था करा
महाराष्ट्र

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोलिस अधिकारी आणि पिडीताच्या कुटुंबियांची घेतली भेट, आरोपींच्या विरोधात चार्जशीट लवकर दाखल करून पीडिताच्या शिक्षणाची व्यवस्था करा

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
कल्याण : डोंबिवलीतील सांगाव अल्पवयीन तरुणावरील सामूहिक बलात्कार प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिकाऱ्याची , पिडीत तरुणी आणि तिच्या आई वडिलांची भेट घेतली . या भेटी नंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोऱ्हे यांनी पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात चार्ज शिट लवकर दाखल करावी. मुलीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन कसे करता येईल याबाबत सूचना पोलिसांना दिल्या . पोलिसांनी फार थोडय़ा काळात आरोपीना पकडले आहे. सर्व प्रकारची प्रक्रिया पोलिसांनी केली आहे. पिडीत मुलीची शिकण्याची इच्छा आहे. तिच्या ऑनलाईन शिक्षणासाठी काय करता येईल. त्यासाठी तिच्या पालकांशी बोलने झाले आहे. तिच्या कुटुंबाला मदत केली आहे. तिचे वडील या प्रकरणामुळे रोजगारावर जाऊ शकत नाही. त्याना बाकीची कामाच्या संदर्भात मदत केली जाईल. पोलिस चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या माध्यमातून मदत देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या मनोधैर्य योजनेतून पिडीत कुटुंबाला येत्या पंधरा दिवसात मदत दिली जाईल अशी माहिती विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
वर्षभरात गायब झालेल्या मुलींची माहिती घेत त्यांच्या अडचणी समजून घ्या –नीलम गोऱ्हे यांच्या पोलिसांना सूचना
डोंबिवली प्रकरणातील मुलीच्या आई वडिलांनी मुलगी मिसिंग झाल्याची तक्रार केलीहोती. मात्र काही तासात मुलगी परत आली होती. त्यामुळे त्यांची काही तक्रार नाही असे पालकांनी सांगितले होते .या पार्श्वभूमीवर वर्षभरात हरविलेल्या, अपहरण झालेल्या किंवा गायब झालेल्या मुली जर परत आल्या असतील तर या मुली सुरक्षित आहेत ना? त्याची माहिती सामाजिक संघटनाच्या माध्यमातून घेत या मुली अडचणीत असतील तर महिला दक्षता समितीने इतर काही गटांना जोडून घेत या मुलीना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी अशा सूचना विधानपरिषद उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसाना दिल्या आहेत.तरुणांमध्ये कायद्याच्या जनजागृती ची आवश्यकता आहे ,सगळंच काम पोलीस करू शकत नाही नागरिकांनी देखील आशा घटना घडू नये यासाठी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे , यावेळी सोबत कल्याण पश्चिमचे आ विश्वनाथ भोईर कल्याण शहर अध्यक्ष गोपाळ लांडगे ,विजया पोटे,आणि इतर शिवसेना पदाधिकारी ,कार्यकत्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related posts

रस्त्यांची होणारी बोगस कामे हा ठाणे जिल्ह्याला शाप आहे – कपिल पाटील

Bundeli Khabar

राज्यपाल सन्मानित महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर डॉ. मनिलाल शिंपी यांना नागपूर येथे ” जीवन गौरव २०२१ ” पुरस्कार प्रदान

Bundeli Khabar

राज्यपाल ने किया डॉ. मीना राजपूत एवं राकेश कुमार दुबे की पुस्तक ‘अंतर-तम-ज्ञान’ का लोकार्पण

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!