कल्याण पश्चिम येथील लसिकरणाला मोठा प्रतिसाद !
आर एस पी युनिट व शिक्षक सेना यांच्या कार्याला मानाचा मुजरा।
किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कल्याण ठाणे व शिक्षक सेना कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पश्चिम मुंबई विद्यापीठ विभागीय कार्यालय वसंतव्हॅली येथे नुकताच आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी, आर एस पी अधिकारी श्री. महादेव क्षिरसागर,श्री अनंत किनगे, विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक श्री.सुनिलजी वायले आणि विभागप्रमुख श्री. विद्याधर भोईर यांनी उपस्थित राहुन एक हजार टोकन नागरिकांना वाटप केले.त्यामुळे नागरिकानी विश्वास ठेऊन या लसीकरण मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला .व संपूर्ण दिवसभरात १५०० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला, आजपर्यंत आतापर्यंत या ठिकाणी ९००० ज्येष्ट,श्रेष्ठ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम राबवली जात असून, ज्येष्ठ नागरिकांना आदराने आधी लस घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.यामुळे कल्याण पश्चिम भागात माननीय श्री सुनील जी वायले माजी नगरसेवक,कमांडर डॉ. मणिलाल शिंपी, श्री.आर आर भोकनल, श्री बन्सीलाल महाजन आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कल्याण ठाणे,आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि कौतुक समस्त नागरिकांकडून केले जात आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीआर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कल्याण ठाणे,व शिक्षक सेना कल्याण यांनी विशेष मेहनत घेतली।