26.2 C
Madhya Pradesh
April 13, 2024
Bundeli Khabar
Home » भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथे दहीहंडी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणार – नगरसेवक श्री.यशवंत टावरे
महाराष्ट्र

भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथे दहीहंडी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणार – नगरसेवक श्री.यशवंत टावरे

भगवानदास विश्वकर्मा/महाराष्ट्र
भिवंडी : दहीहंडी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात यंदाही कोरोनामुळे शुकशुकाट दिसणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्णयामुळे तसेच उत्सव होणार नसल्याची आधीच कल्पना असल्यामुळे भिवंडी शहरातील गोविंदा पथकांनी नियमाचे पालन करून यंदाही दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे।

प्रसंगी भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथील भाजपा नगरसेवक श्री.यशवंत टावरे प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, दरवर्षी लाखमोलाच्या दहीहंडीतील लोणी मटकावण्यासाठी अवघ्या शहरात गोविंदा, गोपाळ आणि गोपिकांचा जणू महासागरच लोटलेला असतो. परंतु कोरोनामुळे गेली दोन वर्षे या उत्सवात खंड पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याही वर्षी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय दिल्यामुळे भिवंडीतील मंडळांनी याही वर्षी सर्व नियमाचे पालन करून हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे सावट अजूनही गेलेला नाही. त्यामुळे यंदाही घागर उताणीच दिसणार आहे. तरी आम्ही दहीहंडी उत्सव सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधेपणाने दहीहंडी बांधून तिची पूजा करून फोडली जाणार असल्याचे नगरसेवक श्री.यशवंत टावरे यांनी माध्यमांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले।

Related posts

आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Bundeli Khabar

द्वारकामाई चैरिटी संस्था द्वारा श्रीगणेश उत्सव प्रतियोगिता

Bundeli Khabar

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक येथील ५०० आशा सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून् सन्मान

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!